दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
==================
निलंगा: देवणी तालुक्यातील हिसामनगर येथुन वाहणाऱ्या मांजरा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी उभी करण्यात आलेली बोट प्रशासनाने
दि 19 एप्रिल सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास जिलेटीनच्या साह्याने नष्ट केली आहे या कारवाईमुळे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांचे भाडे दणाणले हिसामनगर येथून मांजरी नदी वाहते या नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी बोट उभी करण्यात आली होती दरम्यान सायंकाळी प्रशासनाने हि बोट जिलेटिन च्या साह्याने नष्ट केली आहे.यावेळी
उपविभागीय अधिकारी निलंगा श्रीमती शोभा जाधव यांनी प्रत्यक्ष जायमोक्यावर तहसीलदार सुरेश घोळवे, मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे, तलाठी आतिश बनसोडे, अब्रार शेख व सचिन बोटुळे यांच्या समवेत जाऊन जिलेटिन च्या साह्याने बोट उडवून नष्ट केली.
