
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
;;;;;;;;:;;::::::::::::::::::;;;;::;;;;;;;;;
आर्णि तालुक्यातील येत असलेल्या जि,प, उच्च प्राथमिक मराठी शाळा आयता येथिल शिक्षक श्री ईश्वर चव्हाण यांना नुकतेच 20 एप्रिल 2023 रोजी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या कडून दिला जाणारा आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब,जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ साहेब,आणि यवतमाळ जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला*
*शिक्षक श्री ईश्वर चव्हाण यांनी जि प शाळा आयता येथे विविध उपक्रम राबवित विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्न करत असतात.पासवर्ड यशाचा ध्यास शिष्यवृत्तीचा,कौन बनेगा ज्ञानपती, असे अनेक नवनवीन उपक्रम ते शाळेत राबवित असतात.मागील वर्षी त्यांच्या शाळेतील सहा पैकी सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होऊन त्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे.महादीप परीक्षा,नवोदय परीक्षा या सारख्या स्पर्धा परीक्षेत त्यांनी सामान्य कुटुंबातील मुलांना योग्य मार्गदर्शन करून यश मिळवून दिले आहे.या सर्व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन जि प यवतमाळ कडून अत्यंत मानाचा समजला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.हा सन्मान माझा नसून शेतकरी,शेतमजूर यांच्या मुलांनी नवोदय, शिष्यवृत्ती, महादीप या सारख्या स्पर्धा परीक्षेत मिळविलेल्या यशाचा हा गौरव आहे असे श्री ईश्वर चव्हाण यांनी सांगितले. या पुरस्कारासाठी त्यांनी आर्णी प स चे गटशिक्षणाधिकारी आदरणीय रावते साहेब,केंद्रप्रमुख श्री परमार साहेब,शाळेचे मु अ श्री अशोक खडसे सर,श्री महेश शिंदे,श्री आसाराम चव्हाण,रवी राठोड,भास्कर डहाके आणि नितीन मेश्राम यांचे आभार मानले