
दैनिक चालू वार्ता भूम प्रतिनिधी- नवनाथ यादव
भू म:- शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात नमाज पठण करण्यासाठी ईदगाह व मस्जिद मध्ये आले होते .यावेळी लहान मुलांना घेऊन मुस्लिम समाज बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाला व तसेच ईदगाह येथे सर्व समाजाने गुण्यागोविंदाने नांदावे अशी दुवा करण्यात आली .
यावेळी शहरातील विविध राजकीय सामाजिक संघटना यांनी मुस्लिम बांधवांना, ईदगाह परिसरात व मस्जिद जवळ जाऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी ईदगाह येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात ,श्रीमंत धनाजीराव थोरात ,तालुका काँग्रेस अध्यक्ष रुपेश आप्पा शेंडगे, भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष सुपेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबासाहेब मस्कर ,जिल्हा सरचिटणीस विलास शाळू, अमोल सुरवसे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड ,ऑल मुस्लिम एकता महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार ,तालुका अध्यक्ष महेंद्र गायकवाड, माजी नगरसेवक अशोक टिपे, विहंग कदम, अमोल शेलार,यावेळी भूम पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस अधिकारी मंगेश साळवे यांनी शहरातील चौका चौकात चोख बंदोबस्त दिला होता.