
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.22 वडगाव शेरी येथील मस्जिदे कुबा गणेशनगर येथे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून मा. आमदार श्री बापूसाहेन पठारे यांनी मुस्लिम बांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की “बंधुत्वाचा संदेश देऊन
विश्वबंधुत्व वाढीस लावूया,
ईद दिनी हीच इच्छा,आपण सर्वांनी जोपासली पाहिजे. सर्व बांधवानी सर्वांच्या सुख दुःखात वेळोवेळी सामील झाले पाहिजे यातून आपल्या एकतेचा संदेश जगापर्यंत पोचेल. या वेळी सर्व मुस्लिम बांधवानी मा. आमदार श्री बापूसाहेब पठारे यांचा यथोचित सत्कार करून त्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले.
या प्रसंगी मस्जिदे कुबाचे अध्यक्ष अय्युब सय्यद यांनी ही मराठी बांधवाना अक्षय तृतीया निमित्त शुभेच्छा देऊन एकतेचा संदेश दिला.
या वेळी मस्जिदे कुबाचे उपाध्यक्ष कादरभाई मुलाणी, समीर खान,उद्योजक नबाब सय्यद व असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते. दैनिक चालू वार्ता तर्फे प्रतिनिधी श्री स्वरूप गिरमकर यांनीही पवित्र रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.