
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर
चंद्रपूर :- येथील संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेल्या माता महाकाली मंदिराच्या जननी, राजमाता राणी हिराई यांच्या जयंती निमित्ताने शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात महिला मेळावा तथा सांस्कृतिक कार्यक्रम व जयंती सोहळ्याचे आयोजन गोंडवाना मातृशक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने करण्यात आले आहे.
दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी रोज रविवारला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजित कार्यक्रमाला सालेकसा येथील साहित्यिका उषाकिरण आत्राम, गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष तथा ब्रम्हपुरी नगरपंचायतीच्या नगरसेविका अर्चनाताई खंडाते, रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाळीवे, जिवती नगरपंचायतीच्या नगरसेविका सतलूबाई जुमनाके, पोंभुर्णा पंचायत समितीच्या माजी सभापती अलकाताई आत्राम, वर्धा येथील साहित्यिका रंजनाताई उईके, गोंडी धर्म प्रचारिका कल्पनाताई चिकराम, वर्धा प्रकल्प सहायक प्रकल्प अधिकारी नंदनी धावंजेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
राजमाता राणी हिराई यांची खरी ओळख गोंडवानाच्या मातृशक्तींना व्हावी या उद्देशाने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात दि. 23 एप्रिल 2023 रोजी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने जिल्ह्यातील मातृशक्ती तथा पितृशक्तींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष अर्चनाताई खंडाते यांनी केले.