
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील मौजे सुंडगी येथे दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे जगत ज्योती महात्मा बसेश्वर यांची १९८ वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच श्री दिलीप रामराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी श्री संजय मारोतराव पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक सौ.तेलंग मॅडम यावेळी महात्मा बसेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आपले विचार व्यक्त करताना प्रा भीमराव दिनके सिधु महाविद्यालय देगलूर,
यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त विचार व्यक्त करताना म्हणाले की महात्मा बसेश्वर यांनी बाराव्या शतकामध्ये बहुजन समाजातील सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन अनुभव मंडपाची स्थापना केली अनुभव मंडपाच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्य त्यांनी केले व तसेच बसवेश्वरांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार झालेला नव्हता व तसेच एकही शेतकरी आत्महत्या केलेला नव्हता महात्मा बसवेश्वर यांचे विचार परिवर्तनवादी विचार होते असे प्रतिपादन प्रा भीमराव दिपके यांनी केले आसे. तसेच आज जागतिक वसुंदरा दिनानिमित्त ग्रामपंचायत च्या वतीने ही कचऱ्याचे महत्त्व तसेच झाडे लावा झाडे जगवा प्लास्टिक बंदी वर विविध उपाय योजना माहिती देखील देखील देण्यात आली व तसेच वनांची देखवाल करण्यासाठी आळाकरण्यात आले यावेळी गावातील माजी सरपंच बाळासाहेब लगडे पाटील शालेय शिक्षण समितीची अध्यक्ष नामदेव तोटवाड, गंगाधर सुंडगीकर पांडुरंग पाटील निळकंठ पाटील, हनमंतराव पाटील, कपिलदेशमुख, दिगंबर पाटिल सुंडगीकर
माधव बरसमवार ग्रा प व सदस्य श्री नरेंद्र पाटील मुंडकर संजय गवलवाड श्री हारेबा कांबळे श्री तुकाराम कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष सुंडगी. अशोक बरसनवार ग्रामरोजगार सेवक
रंजीत कांबळे ग्रामपंचायत सदस्य यादव दिपके. माधवराव कांबळे, संग्राम संभाळे राजू कांबळे मारोती सुंभाळे गावातील सर्व नागरिक व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.