
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
—————————————-
भिगवण- डाळज नं 3
ता. 22/4 / 2023 रोजी , मौजे डाळज नं 3 गावाच्या हद्दीत महामार्ग क्र 113 + 200 जवळ साईड पट्टी पासुन 6 फुट अंतरावर एका अज्ञात इसमाला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने ठेस दिल्याने अज्ञात वाहनाचे चाक अज्ञात इसमाच्या डोक्यावरून गेले आहे. फिर्यादी जबाब ता. 22/4/2023 माझे नाव – किसन गुलाबराव जगताप वय 46 वर्ष व्यवसाय शेती रा डाळज नं उ ता इंदापुर जि पुणे असे समजल्याने मी सदर ठिकाणी जावुन पाहीले असता एक अज्ञात इसम पालथ्या स्थितीत पडलेला दिसला. त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्याचे डोक्यावरून कोणत्यातरी अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने तो जागीच मयत झाला होता. सदर मयत इसमाची अध्याप वोळख पटलेली नाही कोणत्यातरी अज्ञात वाहनाने अपघाताची खबर न देता निघुन गेला आहे. सदरचा अपघात हा डाळज 3 सकाळी 10/00 वा ते 10 /30 च्या दरम्यान घडला असावा नंतर हायवे पोलीस, NAHI ची हायवे पेट्रोलिंगची गाडी तसेच भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी मयत बॉडी पोस्ट मार्टेमला इंदापुर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवुन दिली आहे.सदर घटणेचा तपास भिगवण पोलीस करत आहे. असे किसन गुलाबराव जगताप यांचे मनने आहे.