दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:तब्बल २९ दिवसाच्या उपवासानंतर मुस्लिम बांधवांनी येथील ईदगाह मैदानावर शनिवारी सकाळी सामूहिक नमाज पठण करून एकमेकांना गळाभेट करीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यांचा २९ दिवसानंतर शनिवारी शेवट झाला. येथील ईदगाह मैदानावर रमजान ईद ची नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. येथील काझी इमदाद अली व मुक्ती मुक्तारोदिन यांनी नमाज पठनाला प्रारंभ केला. तदनंतर उपस्थित जनसमुदायाकडून पठण करण्यात आला. अकराच्या सुमारास सोहळ्याचा समारोप विशेष दुवा ने करण्यात आला. ईद चे नमाज पठण पार पडल्यानंतर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
मुस्लिम बांधवांना शुभेच्छादेण्यासाठी घरी गेलेल्या मित्रमंडळीचा व पाहुण्यांचा पाहुणचार खास खाद्यपदार्थ शीरखुम्याने करण्यात आला. शीरखुर्माच्या गोडव्याप्रमाणे नातेसंबंधातील गोडवा वाढावा अशीच अपेक्षा यावेळी अनेकाने व्यक्त केली. यावेळी आ. जितेश अंतापुरकर, माजी आमदार सुभाष साबणे, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, माजी नगराध्यक्ष शंकरराव कन्तेवार, उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड. अंकुश देसाईदेगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील, अनिल पाटील खानापूरकर, माजी उपनगराध्यक्ष बालाजी रोयलावार, अविनाश निलमवार, नंदू शाखावार, बिस्मिल्ला कुरेशी, मिरामोयोद्दीन, शत्रुघ्न वाघमारे, सुशील देगलूरकर, भाजपा शहराध्यक्ष अशोक गंदपवार, अनिल बोन्लावार, बारी, शाहरुख, मोहसीन, करीम बागवानसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला.
