
दैनिक चालू वार्ता पुणे प्रतिनिधी –अनिल पाटणकर
पुणे :- समाज्यातील प्रत्येकामध्ये लोकभावना जागृत करून लोकसेवा व आध्यात्मिकता याचा प्रचार आणि प्रसार करण्याऱ्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील मार्केट यार्ड,गंगाधाम येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे ससून हॉस्पिटल,वाय.सी.एम.हॉस्पिटल,पुणे यांचे सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पुणे विभागातून एकूण ११८० रक्तदात्यांनी उस्फुर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेश मुजुमले,महेश कदम, निलेश खिस्ती,महादेव कांबळे,संतोष वडके,सोमनाथ शिर्के,रोहित शिंदे,सतीश गायकवाड,अमोल सुपेकर,राहुल गडाप्पे,गणेश शिंदे, गणेश जयकर,माऊली पांचाळ आणि सुनील कडू यांचेसह संत निरंकारी ट्रस्ट चे पुणे विभाग प्रमुख ताराचंद करमचंदानी व ज्ञान प्रचारक अनिल भावेकर, पदाधिकारी आणि सेवेकरी उपस्थित होते..
वर्तमानपत्र विक्रेत्यांचा विशेष सहभाग
पुण्यातील पद्मावती वृत्तपत्र विभाग विक्रेते महादेव कांबळे, महेश कदम, संतोष वडके, सतीश गायकवाड, अमोल सुपेकर, राहुल गडाप्पे, गणेश जयकर, माऊली पांचाळ तसेच क्वार्टर गेट वृत्तपत्र विभागातून निलेश खिस्ती यांनी उपस्थित राहून रक्तदान केले.