
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
श्री माता वासवी कन्यका परमेश्वरी देवीच्या प्राणप्रतिष्ठापना दिवसाच्या निमित्याने चंद्रपूर शहरात निघालेल्या पालखी सोहळ्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांच्या मार्गदर्शनात शहर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने गिरनार चौक येथे भक्तीपुर्ण वातावरणात मातेचा जयघोष करीत भव्य स्वागत करण्यात आले. पालखीत सहभागी भाविकांना व देवी भक्तांना शहर जिल्हा भाजपाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, माजी नगरसेवक व शहर भाजपा महामंत्री सुभाषभाऊ कासनगोट्टूवार यांच्या उपस्थितीत शितपेयाचे वाटप करण्यात आले.