
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- शिक्षण हे सर्वागीण विकासाचे माध्यम असून तमाम बहुजनांना शिक्षणाची कास धरावी आपले जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणच आपल्याला मदत करं शकते आणी हेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होते असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ते जेष्ठ नेते गणेशदादा हाक्के पाटील यांनी केले.
तालूक्यातील मौजे खंडाळी येथे ते भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,प्रा.युवराज धसवाडीकर,अँड.रमेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सूरूवातीला महापूरूषांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्या नंतर गणेश हाक्के पाटील यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे अनावरण करण्यात आले.सामूहिक त्रीशरण पंचशिला नंतर जाहीर सभा सूरूवात झाली.
पूढे बोलताना गणेश हक्के पाटील म्हणाले की,पिढ्यान पिढ्या येथील दलित,बहुजन, वंचीत आदीवासी समाजास शिक्षणापासून दूर ठेवले होते.मात्र डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून हक्क मिळवून दिले आहेत.
आता हक्क मिळाला असल्याने शिक्षण घेवून आपले जीवन समृध्द बनवावे असे अवाहन केले.
या सभेत प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित असणारे डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,प्रा.युवराज धसवाडीकर,अँड.रमेश गायकवाड यांची समायोचीत भाषणे झाली. गावातील छोट्या छोट्या बालकांनी भाषणे केली त्यांना पूढे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.सूभाष सोनकांबळे यांनी केले.तर आभार शरद सोनकांबळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी पूढाकार घेतला.