
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर/लातूर :-तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदपूर येथील पंचवार्षिक निवडणुका 2023 ते 2028 पर्यंत कार्यरत असणाऱ्या सत्यमेव जयते शिक्षक समृध्दी पॅनलचा बोलबाला राहणार आहे त्यासाठी बहुमतानी निवडुण द्यावे असे आव्हान श्री चौधरी रणजित शरणबसप्पा यांनी केले आहे तसेच या जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित निवडणूक मध्ये एकुण 754 मतदान पैकी पुरुष 536 आणि स्त्री 218आहे तसेच चौधरी यांनी मतदार सभासदांना आव्हान केले आहे की येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये आपण सत्यमेव जयते शिक्षक समृध्दी पॅनलच्या वतीने सर्व शिक्षकांना न्याय मिळवून देणार आहोत तसेच खालील सभासद खुल्या प्रवर्गातील गिरी संकेतगीर हणमंतगीर, गुट्टे गोपाळ रामराव,गुळवे अनिल व्यंकटराव, चौधरी रणजित शरणबसप्पा,जाधव बंकट हरिश्चंद्र,पालकुर्तावार संजय हणमंतराव,पोतवळे अंकुश सुभाषराव,मुजावर हसन रसुलसाब, श्रीमती राठोड कविता प्रल्हाद आणि लांडगे काशीनाथ मारोतराव तसेच अनुसूचित जाती/जमाती मध्ये गायकवाड राहुल भिमराव, महिला राखीव मध्ये सौ.जाधव बालिकाताई माणिकराव,सौ.पाटील ज्योती गंगाधर, आणि इतर मागासवर्गीय मध्ये बिराजदार रमेश भानुदास आणि विमुक्त जाती भटक्या जमाती मध्ये हलगरे सतीश मारोती एकुण 15 सभासद सत्यमेव जयते शिक्षक समृध्दी पॅनलकडुन पंचवार्षिक निवडणूक लढविणार असल्याचे चौधरी रणजित यांनी सांगितले तसेच मतदार सभासदांना प्रचंड बहुमताने कपबशी या चिन्हा समोर बटन दाबून विजयी करावे असे आव्हान केले आहे