
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि: अन्वर कादरी
मनपा, छत्रपती संभाजी नगर शहराच्या संयुक्तिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश आज महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले.
स्मार्ट सिटी कार्यालयात त्यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक घेतली, याप्रसंगी ते बोलत होते.
नालेसफाई सह संपूर्ण शहराच्या एक संयुक्तिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा मे अखेर पर्यंत सादर करण्यासंदर्भात त्यांनी निर्देश दिले. सध्या स्थितीत सुरू असलेले नालेसफाई चे काम मे अखेर पर्यंत संपूर्ण करावे असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
याशिवाय नालेसफाईच्या कामांसाठी माणसा वाढवून देण्यास संदर्भात त्यांनी सूचना केल्या. ते म्हणाले की एका जेसीबी वर दोन पाळीत दोन ऑपरेटर ठेवून कमीत कमी 16 तास नालेसफाईचे काम केले पाहिजे, ते म्हणाले.
याशिवाय त्यांनी झोन निहाय नाले सफाई आणि आपत्ती व्यवस्थापन चा आढावा देखील घेतला.
यावेळी त्यांनी कोणत्या झोन मध्ये अतिवृष्टी किंवा जास्त पाऊस पडल्यावर कोणत्या भागात सर्वात जास्त अडचणी निर्माण होते याचा देखील सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आपत्ती व्यवस्थापन विभागांनी जेवढा लवकर होऊ शकते तेवढ्या लवकर सिटी डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन (CDMP) सादर करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
खाम आणि सुखना या दोन्ही नद्यांवर झालेली अतिक्रमण त्वरित काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, रवींद्र निकम, शहर अभियंता एबी देशमुख, उपसंचालक नगर रचना गरजे, उपयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव, उपायुक्त तथा सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 04 राहुल सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता बि डी फड, आर एन संघा, डि.के पंडित, आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख स्वप्निल सरदार सर्व वॉर्ड अधिकारी आणि वार्ड अभियंता यांची उपस्थिती होती.