
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड – गोविंद पवार
लोहा पंचायत समितीचे शिवसेनेचे माजी पंचायत समिती सभापती सतीश संभाजीराव पाटील उमरेकर यांच्या वतीने नांदेड येथील ए.के संभाजी मंगल कार्यालयात १२ जोडप्याचा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला
समाजातील गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या मुला – मुलीच्या लग्नासाठी अमाप खर्च होऊ नये वधू-वर पिता ते कर्ज बाजारी होऊ नये म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत शिवसेनेचे लोहा पंचायत समितीचे माजी सभापती सतीश संभाजीराव पाटील उमरेकर यांच्या वतीने नांदेड येथील ए.के संभाजी मंगल कार्यालयात १२ जोडप्याचा सामुहिक विवाह लावण्यात आला.
यावेळी वधु -वराना आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी पालकमंत्री डी पी सावंत आ.अमर राजुरकर, माजी आ. रोहिदास चव्हाण, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख भुंजगराव पाटील डक, मुक्तेश्वर धोंडगे, जिल्हा संघटक नेताजी भोसले, शिवसेनेच्या नांदेड जिल्हा महिला संघटक वच्छलाताई पुयड, कार्यक्रमाचे आयोजक शिवसेनेचे माजी पंचायत समिती सभापती सतीश संभाजीराव पाटील उमरेकर, शिवसेनेचे लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, काँग्रेसचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील, युवा सेनेचे लोहा-कंधार विधानसभा प्रमुख बालाजी गाडेकर, शिवसेनेचे कंधार तालुका प्रमुख परमेश्वर जाधव,अमित हंबर्डे, राजेश चव्हाण, प्रविण पाटील डक यांच्या सह आदी मान्यवर व शिवसैनिक वधु – वरांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.