
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
दि. 09 मे (बिबवेवाडी पुणे)
दि गुड पीपल्स फाउंडेशन च्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकविनारे सिद्धोधन गायकवाड (लोणी, पुणे) यांना आदरणीय झेन मास्टर भंते सुदस्सन आणी निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या लक्ष्मी लोकरे यांना समाजप्रबोधनकार सौ शारदामाई मुंडे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, भारताचे संविधान आणी प्रशस्तीपत्रक देवून संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करून बक्षिस देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थिती मा. झेन मास्टर भंते सुदस्सन, समाजप्रबोधनकार मा. सौ शारदामाई मुंडे, संजय जैन (दि गुड पीपल्स फाउंडेशन मुख्य मार्गदर्शक ), निता गोडबोले (दि गुड पीपल्स फाउंडेशन आरोग्य समिती अध्यक्ष), विजय लोंढे, प्रवीण मोरे, सुदेश भोसले, वर्षा खुणे, विकास जाधव, प्रसेनजीत खुणे, संघिणी मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.