
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील हजारो शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीपासून वंचित आहेत. शेतकरी तालुका कार्यालयात वारंवार कागदपत्रे देऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात अनेक हप्ते पडले नाहीत. म्हणून आज शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांनी जिल्हाधिकारी . अभिजीत राऊत यांची भेट घेऊन या त्रुटी दूर करण्यासाठी सर्कल वाईज शिबीर घेण्याबाबत निवेदन दिले. मा. जिल्हाधिकारी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवून लवकरच शिबीर आयोजित करण्याबाबत आश्वासित केले.