
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:तालूक्यातील मोठ्या गावांपैकी एक असलेले व
राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या वन्नाळी येथील सेवा सहकारी संस्थेचे राजकारण निवडणुक लागण्यापुर्वीच तापले होते.यामुळे देगलूर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांचे लक्ष वन्नाळीकडे होते.
माञ नांदेड जिल्हा परीषदेचे शिक्षण व क्रीडा समितीचे सदस्य बस्वराज पाटील वन्नाळीकर यांनी यशस्वी मध्यस्थी करत गावातील 95% लोकसंख्या ज्या चार मोठ्या बहुसंख्य समाजाची आहे त्या समाजाला प्रत्येकी समान वाटा देत लिंगायत-3,मराठा-3,गोलेवार-3, मुस्लिम-3 तसेच बौद्ध समाजाला 1 असे एकूण 13 संचालक सर्वानुमते निवडले गेले.सर्वधर्मीय समतोल साधत सर्वसमावेशक कार्यकर्त्यांची वर्णी लावल्याने ही निवडणुक अखेर बिनविरोध झाली.
वन्नाळी म्हणजे बस्वराज पाटील वन्नाळीकर यांचे गाव अशी ओळख आहे.दरम्यान यावेळी बस्वराज पाटील यांनी स्थानिक राजकारणापासून अलिप्त राहून गावातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम बळ देण्याची भूमिका घेत, वन्नाळी गावातील सर्वधर्मीय सर्व समावेशक समतोल राखत सर्वांना समान न्याय देण्याच्या हेतूने गावाचे प्रमुख या नात्याने त्यांनी बेरेजेच्या राजकारणातून मध्यस्थी केल्याने, यावर गावकर्यांची एकमताने सहमती होत हे निवडणूक बिनविरोध पार पाडली.
दरम्यान अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 12 मे रोजी १३ जागासाठी गावातील फक्त १३ जणाचेच नामांकन अर्ज दाखल केले होते. 15 मे रोजी छाननीअंती सर्व 13 अर्ज मंजूर करण्यात आले, त्यामुळे बिनविरोध निवडणूक पार पडली. दरम्यान अर्ज भरण्याच्या अंतिम टप्यात काँग्रेस नेते बस्वराज पाटील वन्नाळीकर यांनी सगळ्यांना विश्वासात घेत व बैठका घेवून मध्यस्थीने सूचवलेल्या प्रस्तावित नावावर सर्वांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे १३ जण रिंगणात राहील्याने निवडणूक अधिकारी श्री.जी.एस.कुलकर्णी यांनी बिनविरोध निवडणूकीवर शिक्कामोर्तब केले.
बिनविरोध झालेल्या नवीन संचालक मंडळामध्ये
पाटील शारदाबाई मलिकार्जुन
पाटील श्रीधर नागनाथराव
शेवाळे बसवंत विठ्ठलराव
पाटील यशवंत माधवराव
पाटील रमेश तेजेराव
पाटील पांडुरंग मारोती(साधू)
अंकमवार देवराव मारोती
दोसलवार माधवराव विठ्ठल
कोरेवार गंगाधर संभाजी
पठाण मुनवरखा अलीखा
पठाण घांशीबी महेबुबखा
शेख शरीफाबी रसूलसाब
वाघमारे शंकर भुजंग
यांचा समावेश आहे. दरम्यान तज्ञ संचालक म्हणून रमेश सयाराम दोसलवार व प्रकाश इरबा पांचाळ या दोघांची तर कार्यलक्ष्यी संचालक म्हणून बालेजी बाबूसाब शेख यांची संस्थेच्या पहिल्या बैठकीत नियुक्ती करण्याचे ठरले.
दरम्यान वन्नाळी सेवा सहकारी संस्था स्थापनेपासून सहकारातील जुने नेते कै.मल्लिकार्जुन संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हयातीपर्यंत दिर्घकाळ एकहाती सत्ता होती.कै.मल्लिकार्जुन संभाजीराव पाटील यांचा राजकीय वारसा बस्वराज पाटील वन्नाळीकर यशस्वीपणे चालवत आहेत.विशेष म्हणजे गेल्या चार महिण्यापूर्वी सदरील संस्थेवर भाजपा प्रणित संचालक मंडळ येथे प्रशासक म्हणून कार्यान्वित करण्यात आलं होते. मात्र सहकार खात्याकडून 8 मे रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली होती यासाठी 10 जूनला मतदान घेण्यात येणार होते. दरम्यान वन्नाळीचे माजी सरपंच रमेश गंगाराम पाटील,विद्यमान सरपंच हनमंत सायन्ना दोसलवार,गोविंद दिगंबरराव शिरपेवार सावकार, माजी सरपंच विठ्ठल गंगाराम पाटील, व्हाईस चेअरमन हैदरखान जलालखान पठाण, माजी उपसरपंच तथा शिवसेना तालुका संघटक बसवंत माधवराव पा.गाडले,माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय यादवराव पाटील, ज्येष्ठ नागरीक सूर्यकांत धोंडीबा कोरेवार, उपसरपंच अजीज जमालोद्दीन शेख,माजी उपसरपंच राजअहमद बाबूसाब शेख, माजी चेअरमन माधवराव पिराजीराव येशमवार,माजी उपसरपंच महंमदखा चांदखा पठाण,बालाजी नरसिंगराव कोरेवार, महेबूबखा जमालखा पठाण (पोस्टमन), पठाण आयुबखा हैदरखा (कलाल गुरुजी), गंगाराम लक्ष्मण कोरेवार,ग्रामपंचायत सदस्य मुजीब चांदखा पठाण,श्रीनिवास हनमंत अंकमवार,सर्व सभासद बांधव तसेच सर्वच गावकरी मंडळींनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य केले.
शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्राध्यापक डॉ.सुनील हनमंतराव पाटील,ग्रामपंचायत सदस्य गिरीधर लालबा पाटील,सहकार नेते मा.चेअरमन कै.मल्लिकार्जुन संभाजीराव पाटील यांचे चिरंजीव बालाजी मल्लिकार्जुन पाटील,या तिघांनी यशस्वी शिष्टाई केली
चौकट..बस्वराज पाटील वन्नाळीकर यांना आपण संचालक पण का झाला नाहीत?असे विचारले असता त्यांनी सांगितले की आपल्या पाठीशी असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी आपण माघार घेतली…
ग्राउंड लेव्हलला जो कार्यकर्ता काम करतो त्या कार्यकर्त्याला न्याय मिळालाच पाहिजे या मताचा मी आहे…
प्रत्येक जागी मीच ही भूमिका चुकीची आहे…
नवीन सर्व बिनविरोध 13 संचालकाचे अभिनंदन व त्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा…!
संस्थेच्या बाबतीत विकासात्मक पुढील वाटचाल काय असेल? असे विचारले असता त्यांनी सांगितले की
गावातील सर्वच शेतकऱ्यांना तात्काळ एक महिन्याच्या आत संस्थेचे सभासद करून घेण्यात येतील…संस्था थकबाकी मुक्त करून सर्वच सभासदांना कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात येईल … संस्थेसाठी स्वतंत्र कार्यालय तयार करण्यात येईल… पाच वर्षाच्या काळात एकही गरजू शेतकरी कर्ज व सभासदापासून वंचित ठेवणार नाही…
शासनाच्या लाभाच्या विविध योजना राबवण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न करू
शेतकऱ्यांच्या हिताचा पानंद रस्त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेऊ
संस्थेला जिल्ह्यात एक नंबर वर आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे ते म्हणाले…