
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी -बालाजी देशमुख
बीड/केज –एल आय सी आपली सुरक्षा व बचत याची हमी देते यावरून सिद्ध होते. आंधळेवाडी ता केज येथील काशीबाई भगवान आंधळे वय 29 वर्ष यांनी भारतीय जिवन विमा निगम आर्थात एल आय सी ची वार्षिक हप्ता योजनेतुन त्यांनी दोन वर्षिक हप्ते भरले परंतू नंतर काशीबाई आजारी पडल्या काही दिवसानंतर त्या मरण पावल्या . विमा प्रतिनिधी भागवत प्रभाकर पटाईत यांनी आंबाजोगाई शाखेत जावुन या घटनेची वरिष्ठ अधिकारी यांना सविस्तर अहवाल दिला . काही दिवसापुर्वी एल आय सी च्या डिव्हीजन आँफिस ला अहवाल पाठवला आणि तो मंजुर झाला .
काशीबाई च्या मृत्यु दाव्यापोटी
2 लक्ष 27 हजार 600 रू चा क्लेम मंजूर झाल्याचे पत्र दिले व सदरील रक्कम त्याचे कुटुंबिय वारसास म्हणजे भगवान आंधळे यांच्या बँक खात्यात जमा झाली.
या रकमेचा माझ्या 8 वर्षाच्या मुलिच्या शिक्षणासाठी , उपयोग होईल असे मत आंधळे कुटुंबाने
व्यक्त केले .
हा क्लेम मिळवुन देण्यासाठी विमा प्रतिनिधी भागवत पटाईत यांनी वेळोवेळी पाठपूरवा व अथक परिश्रम घेतले .यावेळी वरिष्ठ शाखा प्रबंधक अतुलजी कदम साहेब यांनी जिवन विम्याचे महत्व समजावुन सांगितले,विकास अधिकारी दत्तासाहेब सावंत ,विमा प्रतिनिधी भागवत पटाईत ,मोराळे साहेब ,ढाकणे साहेब ,साहेबराव आंधळे
सुरेश आंधळे आदी उपस्थित होते. शेवटी एल आय सी ,व शाखेतील सर्व अधिकाऱ्यांचे
आंधळे कुटुंबीयांनी आभार मानले.