
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: गेल्या काही दिवसापूर्वी कर्नाटक राज्याच्या निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेते कर्नाटक मध्ये जाऊन रॅली व मोठमोठ्या सहभाग घेतल्या त्याच कर्नाटक मध्ये जात असताना त्यांना देगलूर ते हनेगाव रस्त्याची झालेली दैनि अवस्था दिसली नाही का दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन बडेबडे बाता करून तिथल्या जनतेला खुश करण्यापेक्षा स्वतःच्या जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तर इथल्या लोकांचे जीवन सुखी तरी होईल. देगलूर ते औराद सीमालगत रस्त्यात खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. या रस्त्यावर दररोज वाहन चालकांचे अपघात होत आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने यााया रस्त्याचे तीन तेरा वाजले की बारा, अशी अवस्था या रस्त्याची झाली असून दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहे.
करडखेल मरखेल हाणेगाव औराद सरमेलगत गेल्या दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे डागडुजी, खडीकरण व डांबरीकरण याचे काम रुपये खर्च केला. परंतु, हा रस्ता निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने दोन वर्षांतच या रस्त्याची वाट लागली या रस्त्याचे काम ठेकेदारामार्फत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने आज रोजी हा रस्ता शेवटच्या घटकामोजत आहे. हा रस्ता कर्नाटक,हा कुठे लावणार? असा झाला आहे. त्यांचा अनेक वेळा अपघात झालेला आहे. दोन वर्षांपूर्वी हा रस्ता बनला
महाराष्ट्र, तेलंगणा या तीन राज्याला जोडणारा रस्ता असून या रस्त्यावर रस्ता सदैव वर्दळीचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहन चालत आहेत या गावातील वाहन चालविणाऱ्या नागरिकांना हा रस्ता मोठा धोकादायक ठरत आहे शासन अपघात टाळण्यासाठी अनेक
उपाययोजना करतात परंतु या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने हा रस्ता ‘आभाळ फाटलं त्याला ठिगळकुठे लावणार? असा झाला आहे.या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने दुचाकीवाल्यांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीचे वेळी या रस्त्यावर येणारी नवीन वाहने काही ठिकाणी रस्ता चांगला असल्यानेवाहन जोरात चालवितात. परंतु त्यांना माहीत नसते, की या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. तेव्हा आहे. या रस्त्यावर खड्डे तर पडलीच आहे परंतु त्या खड्ड्यामध्ये बारीक गिट्टी जमा झाली असल्याने समोरून वाहन आल्यानंतर त्या वाहन चालकांना खड्यातून वाहन घालवावी लागते तेव्हा गाडी स्लिपहोऊन अनेक वेळा अपघात झालेले आहेत. परंतु, सुदैवाने जीवितहानी झाली नाही, ही महत्त्वाची बाब आहे. परंतु, आज रोजी हा रस्ता शेवटच्या घटका मोजत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, या रस्त्यांकडे आता तरी लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर लक्ष घालवे असे मागणी या भागातील नागरिक करत आहेत.