
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
लोहा : – लोहा तालुक्यातील हाळदव येथे साई बाबा मंदिरात अपरा एकादशीच्या शुभेच्छा मुहूर्तावर फराळाचे वाटप करण्यात आले.
अपरा एकादशीनिमित्त साई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविक – भक्तांना व पालम तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेले योगीराज निवृती महाराज संस्थान पेंडु येथे दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भावीक भक्तांना साई मंदिर संस्थानच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी फराळाचे वाटप करण्याताना युवा उद्योजक बंडु पाटील वडजे , संदीप पाटील वडजे सह भावीक भक्त व गांवकरी मंडळींची उपस्थिती होती.