
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:आपल्या प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते काही कर्तव्य दक्ष जबाबदार काही प्रमाणात सुशिक्षित नागरिक असुन देखील गावातील प्रमुख घराणेशाही राजकारणी लोकांनाच
प्रत्येक पाच वर्षाला आपणच निवडून दिलेले आहे. यावर उमेदवार, प्रतिनिधींनी आपल्या परिसरातील वार्डातील पाहाणी दौरे केले पाहिजे आजच्या घडीला तर कुठे ही दिसले नाहीत आता पुढेही पाच वर्षांसाठी द्या यांनाच उमेदवारी चालू राहील का? असे आणि भविष्यातील घडामोडी यावर त्यांची सरास खोटी, बनावट ,आश्वासने घोषणा आपण विकास कामे करू? आपण ते करू? आपण हे करू?
असे म्हणतात… निवडून आल्यानंतर पाच वर्ष गावचा विकास तिकडेच राहिला…ते स्वता:चा विकास मात्र करून घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी हजर होतात
पण, भविष्यातील विकास कामांसाठी ते तुम्हाला नीट ही बोलणार नाहीत…
प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच गावातील काही कर्तव्य जबाबदारी नागरिक म्हणून त्यांचे हक्काचे व्यासपीठ भाषण करतात.. , आमदार आला की भाषण करून जातो खासदार आले की भाषण करून जातो जिल्हा परिषद सदस्य आला की भाषण करून जातो पंचायत समिती सदस्य नी ही भाषण करून जाते..
हि कामे पूर्ण करू ती कामे पुर्ण करू…,
असे बिन बुडाचे भाषण करून जनतेला सतत आणि भरपूर उल्लू बनवतात निवडून आल्यानंतर तुमची साधी समस्या काय आहेत यावर साधं बोलत सुद्धा नाही तुमची कोणाची कामाचे फाईल तुम्ही घेऊन गेला तर बघतात आणि करू देता असे म्हणतात. परंतु काम करत नाहीत असेही अनेक प्रश्न उपस्थित होतात.
जेव्हा निवडणूक झाल्यानंतर सर्व सामान्य जनतेशी राजकारणी नेत्याची काही देणंघेणं नसते.
गावपातळीवर प्रमुख घरपट्टी, पाणीपट्टी वसुली किती याबद्दल माहिती असणे.., थकबाकी किती याबद्दल यादी जाहीर करुन.. समस्या सोडविण्यासाठी
,रोड रस्ते, शुध्द पाणी, गटारांची
ओला, सुका कचरा गोळा करून व्यवस्था करणे, प्रत्येक गावातील सार्वजनिक जागेवर ग्रामपंचायत सदस्य अथवा नागरिक जर अतिक्रमण केले असेल ते दूर करणे, खंब्यावर दिवा बत्ती लावणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे गरजेचे असते, प्रत्येक नागरिकाला आपल्या गाव ग्रामपंचायत कार्यालयामार्फत होणाऱ्या कामाची माहिती तात्काळ न देणे म्हणजे समस्या जशाच्या तशा ठेवणे होय.. समस्या दूर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न फारच कमी आहेत…हे लक्षात येते..१/४/२०२०
पासुन सर्वत्र १५वित्त आयोगाच्या निधी मंजूर होतोय ज्या गावातील मतदानाच्या संख्या वाढ (लोकसंख्या) प्रमाणात ९५७ रु एका व्यक्तीला ग्रामपंचायतीच्या बाॅंक खात्यात जमा होतोय… छोट्या गावात ६ ते १६ लक्ष रुपये निधी मिळतो.. मोठ्या गावात ३० ते ६० लक्ष रुपये निधी शासनाकडून दर वर्षी मंजूर होऊन…
गावातील गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विकास आराखडा तयार केल्या प्रमाणे जमा,खर्च, शिल्लक आहे..का? यावर पारदर्शकता आणण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती दिली जाते. यातुन काही घरकुलयोजना,
बंदिस्त नाली, रोड रस्ते दुरुस्ती, नवीन करणे, दिव्यांगाना ५% निधी मंजूर करून देणे,
शाळा दुरुस्ती साहित्य खरेदी, अंगणवाडी साहित्य खरेदी, सार्वजनिक जागेवर आसण व्यवस्था, गावात सार्वजनिक शौचालये बांधणे सार्वजनिक जागेवर वृक्षलागवड करणे व संगोपन करणे, मुलांना खेळण्यासाठी मैदाने व व्यायाम शाळा तयार करून देणे, पांदण रस्ते सरळीकरण, नदी, नाले,ओढे ,रुंद व सरळ करणे गावातील विहीर स्वच्छ ठेवणे व इतर अनेक योजना राबविल्या जातात त्यातील बरीच कागदावर लिहून अधिकारी यांच्या कार्यालयात ग्रामसेवक सरपंच यांनी पाठवले जातात
योजनांची माहिती सर्वांनाच माहिती करून दिली पाहिजे म्हणजेच शिलाई मशीन,विहिरी,गायकोटा (शेड), योजना असो शेतकरी अवजारे असो शेळी मेंढी गट वाटप असो बचत गटाची योजना असो असं प्रत्येक योजनेतून जनतेला माहित नाही ते पैसे उचलतात या नेत्याचे अधिकारी डुप्लिकेट फाईल तयार करून उचलून घेतात यांची संपत्ती थोडी पाच वर्षानंतर यांच्यापाशी जमा होते हा एवढा पैसा आला कुठून आपण ह्याला निवडून देतो याच कामासाठी का यांच्यामागे झेंडे घेऊन कुत्र्यासारखे फिरावे लागते..
आपापल्या गावचा विकास आपल्याच गावातील नागरिकांनी केला पाहिजे.