
दैनिक चालु वार्ता उमापूर प्रतिनिधी-कृष्णा जाधव
गेवराई/ उमापुर मधील सुरेगाव,गुळज,राक्षस भुवन,या रस्त्यावरून सर्रासपणे वाळू उपसा सुरू आहे.महसूल विभागाचे याकडेदुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.दररोज या रस्त्याने वाळूचे टिप्पर चालू आहे.याकडे प्रशासन व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
गेले कित्येक वर्षापासून ही अवैध्य वाळू सुरू आहे. गुळमेश्वर गुळज रस्त्याला दररोज वाळूचे टिप्पर चालू आहे.याचा नागरिकांनाही खूप त्रास सहन करावा लागतो, कारण हा रस्ता नसून गाडीवाट रस्ता आहे, त्या टिप्पर मुळे धुळीचे वातावरण खूप जास्त प्रमाणात पसरते, त्या रस्त्याला समोर काय आहे हेही दिसत नाही.कारण धुळीचे प्रमाण ही एवढे जास्त आहे.या धुळीचा शेजारच्या वस्तीतील लोकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो.वेळोवेळी सांगूनही हे लोक ऐकत नाही.व नागरिकांवरही मुजोरपणा करतात.सदरील महसूल प्रशासनाने व तहसीलदार साहेबांनी यांच्यावर कठोर ती कारवाई करावी.ही ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.हे टिप्पर पब्लिक एरियातून 70, 80 च्या स्पीडने गाडी चालवतात, त्यात नागरिकांच्या जीवाला धोका असून, तहसीलदार साहेबांनी याकडे लक्ष द्यावे.ही नागरिकांतून खंत व्यक्त होत आहे