
दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुंके
जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना येथील आदर्श विज्ञान व वाणिज्य ज्युनिअर कॉलेजमध्ये एकूण 435 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी इयत्ता बारावी मध्ये उत्तीर्ण झाले असून मागील तीन वर्षापासून परंपरा कायम ठेवत याही वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवले आहे
यामध्ये विज्ञान शाखेचा वेदांत भाडमुखे 88.83% प्रथम अतुल निलाखे 85.37% द्वितीय तर अंजली बेवले 83.64% तसेच वाणिज्य शाखेमध्ये आयुष लाहोटी 86.83% प्रथम वैष्णवी चेडे 84.33% द्वितीय मयूर जाधव 82.22% तृतीय वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार नारायण भाऊ कुचे साहेबांच्या हस्ते आदर्श कॉलेजमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र जी पालकर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गंगाधर पांढरे रामेश्वर वैद्य नाथाजी भोजने मारुती पांढरे शिवाजी तायडे हर्षल भोजने सुरज पांढरे बबन मस्के रामचंद्र भोजने परमेश्वर लंबे यांच्यासह शाळेतील शिक्षक कुंडकर के बी डॉक्टर एम एम पांढरे जी एल नेमाने गणेश भोजने मुख्याध्यापिका वैशाली खिलाडी आशा पांढरे पुष्पा गाडेकर पिटी निळेकर मिस पंडित अनिल वैद्य सह इतर कर्मचारी उपस्थित होते.