
दैनिक चालु वार्ता परतूर/प्रतिनिधी -नामदेव तौर
परतूर,: आषाढी एकादशीनिमित्त टाळ- गजरात, घोष करीत पंढरपूरकडे दिंड्यांचे क्रमण आता सुरू झाले आहे. येनोरा येथे दिंडीतील वारकरी,
व भाविकांचे गावकऱ्यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले दिडी चालक संतराम महाराज जोगदंड यांचा शाल व श्रीफळ देऊन स्वागत यावेळी करण्यात आले. यावेळी आषाढीनिमित्त निघालेल्या दिंडीतील सरपंच उद्धव जोगदंड, संतोष राऊत, नाथाभाऊ टाके सुरेश भुबर व इतर भजनी मंडळी उपस्थित होते..
पंढरपूर पंढरपूर कडे मार्गक्रमण करणाऱ्या दिंडीचे स्वागत करताना नागरिक…