
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:१ जून 2023 रोजी नांदेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचा ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधनार. याच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी दिनांक २७ मे 2023 रोजी संध्याकाळी ६ वाजता खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट देगलूर येथील विश्रामगृह येथे ठेवण्यात आले आहे तरी देगलूर शहरातील व परिसरातील कार्यकर्ते व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान देगलूर तालुका शिवसेना प्रमुख आंबेसांगे यांनी सर्व जनतेस आव्हान केले आहे.