
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नांदेड यांच्याद्वारे दिनांक आठ मे 2023 ते 8 जून 2023 या कालावधी समान संधी पर्व निमित्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती योजना तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनांची प्रचार व प्रसिद्धी कार्यशाळा सुद्धा घेण्यात आली. . या कार्यशाळेमध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती , शिक्षण शुल्क , परीक्षा शुल्क , परदेशी शिष्यवृत्ती , परराज्य शिष्यवृत्ती , जात पडताळणी प्रमाणपत्र , तसेच करिअर मार्गदर्शन , इत्यादी बाबीवर आपापल्या महाविद्यालयात कार्यक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने प्रादेशिक उपायुक्त अविनाशजी देवशेठवार समाज कल्याण विभाग लातूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न झाली.. . या कार्यशाळेमध्ये कोणत्याही शिष्यवृत्ती योजने पासून वंचित राहू नये याची काळजी सर्व शिष्यवृत्ती विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व समान संधी च्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा प्रकारचा सूचक संदेश माननीय अविनाश देवसटवार साहेब यांनी दिला याप्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन यश प्राप्त करता आले त्या त्या विद्यार्थ्याचे मनोगत घेण्यात आले प्रसंगी अध्यक्षीय समारोप होऊन आभाराअंती राष्ट्रगीताने या कार्यशाळेची सांगता झाली