
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- कंधार तालुक्यातील उस्माननगर व शिराढोण परिसरात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा महावितरण कार्यालय उस्माननगर येथील शाखा अभियंता व कर्मचारी यांना रोहित्र ( डिपी ) दुरुस्ती व शेतातील लोंबलेल्या वीज तारा ओढून घ्याव्यात अशी मागणी परिसरातील शेतकरी यांनी करूनही कोणतेही समाधानकारक कार्य झाले नाही.उघड्या रोहित्र( डिपी ) व लोंबलेल्या तारा मुळे उस्माननगर परिसरातील गावामध्ये अनेक ठिकणी झाडाच्या फांद्यामध्ये विजेचे तार गेलेला आहे तर काही ठिकानी दोन तार एकमेकास चिटकण्यास दोन इंचचा अंतर आहे.जर जोरात हवा आलीकी दोन्ही तार एकमेकास चिटकतात व घर्षण होऊन आगीचे गोळे तुटतात यामुळे नागरिकांच्या मनात भय निर्माण झाले आहे यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येते नाही. तरी झाडाच्या फांद्यांत अडकलेले तार मोकळे करावे व महावितरण अधिका-यांनी होणारी जिवित हानी टाळावी असे नागरिकातून बोलल्या जात आहे.
उस्माननगर सह परिसरातील अनेक शेतकरी भाजीपाल्याची लागवड करत असताना बोअर व विहीरीला पाणी असतांना विहिरीवरच्या व बोरवेल वरची मोटार , ना दुरूस्त रोहित्रा ( डिपी )मुळे शेतीला व गुराढोरांना पाणी पिण्यासाठी मिळेना कर्मचारी यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे बळीराजा संकटात आला असल्याचे नागरिकातून बोलल्या जात आहे.
गावालगतचे अनेक रोहित्र ( डिपी)गेले कित्येक महिन्यापासून उघडेच आहे त्यातही विद्दूत तारा बाहेर लटकत आहेत. यासंदर्भात अनेक वेळा गावकर्यांनी कर्मचारी व अभियंता यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क करून दुरुस्ती ची मागणी केली परंतु महावितरण कर्मचारी कुठल्याही मोड वर नसल्याचे चित्र उस्माननगर परिसरात पहावयास मिळत आहे.तरी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून जिथे रोहीत्र(डिपी ) उघडे असतील,ना दुरूस्त असतील झाडाच्या फांद्यांमध्ये तार अडकले असतील तर पावसाळा सुरू होण्याच्या आधी सर्व कामे करावी अशी मागणी शेतकरी व उस्माननगर परिसरातील नागरिकातून होत आहे.