
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- महाराष्ट्रात वाचकांच्या सेवेत मागील दोन वर्षांपासून अहोरात्र परिश्रम घेणा-या दै.चालु वार्ता या पेपरच्या अंकाचे प्रकाशन उस्माननगर येथील विविध श्रेत्रात काम करणा-यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी भाजपा ता. कंधार उपाध्यक्ष तथा तेलंगवाडीचे माजी सरपंच श्री सुरेश मामा बास्टे व व भिमाशंकर मा.व.उच्च मा.वि.शिराढोण येथील प्राध्यापक श्री सोप्पासर व श्री प्राध्यापक वीरभद्र विभुत्ते सर नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री बालाजी टी हाऊस व कृषी दुकान उस्माननगर येथे प्रकाशन करण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून दै.चालु वार्ता पिडीएफ ( ऑनलाईन ) माध्यमातून महाराष्ट्रात सर्वत्र वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.परंतू दै.चालु वार्ता या पेपरच्या वाचकांची वाढती संख्या लक्षात घेता .दै.चालु वार्ता चे मुख्य संपादक श्री डी.एस.लोखंडे पाटील यांनीदि.२५ मे रोज गुरूवार ह्या दिवशी महाराष्ट्रात सर्वत्र वाचकांसाठी दै.चालु वार्ता वृत्तपत्र उपलब्ध करून दिला आहे.आज त्याचाच भाग म्हणून भाजपा कंधार ता.उपाध्यक्ष सुरेश मामा बास्टे व भिमाशंकर मा.व.उच्च मा.वि.शिराढोण येथील प्राध्यापक सोप्पासर व श्री विभुत्ते सर नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत दै चालु वार्ता या वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले यावेळी उस्माननगर विभाग मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे,उपाध्यक्ष माणिक भिसे, सचिव प्रदीप देशमुख, माली पाटील,दै.चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी तथा उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,श्री बालाजी टी हाऊस चे मालक सिध्देश्वर ईसादकर, गुणाजी वारकड,महेमुद पठाण, जिवन सोनसळे,मन्मथ शेकापुरे,वारकड लघू उद्योजक, लक्ष्मण सुरेवाड आदि उपस्थित होते .हा अंक प्रकाशित झाल्यानंतर दै.चालु वार्ता पेपरला भरून शुभेच्छा दिल्या व दररोज हा पेपर वाचन्यासाठी उपलब्ध व्हावा अशी नागरिकांनी व प्रमुखांनी मागणी केली.