
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी भोकर -संदिप किशनराव किसवे पाटील
भोकर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.आ.अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी भोकर तालुक्याच्या विकासाला चालना मिळावी या दृष्टीने सुरुवातीपासूनच शक्य तेवढी मदत केली आहे व आजही त्याच जबाबदारीने या भागात अधिक विकासकामे कशी होतील यासाठी ते प्रयत्नशील आहेत जिल्हा ठिकाणापासून दूर असलेल्या गावापर्यंत जनतेच्या सुविधेसाठी ज्या काही शासकीय कार्यालयाची गरज आहे ती_ती कार्यालय त्या_त्या तालुक्यात जर आपण उपलब्ध करून दिलो तर सर्वसामान्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येण्या जाण्याचा त्रास कमी होऊन तालुक्याच्या ठिकाणी शासनासंदर्भातील कामे पूर्ण करून घेता येतील हा उद्देश समोर ठेवून त्या दृष्टीने विचार करून हे सा.बा. वि.कार्यालय भोकर येथे आणण्यात आले आहे
परंतु या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असतात मात्र या विभागाचे वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता व उपअभियंता साहेब हे एका महिन्यामध्ये काही मोजक्याच दिवशी कार्यालयात उपस्थित असतात व सर्व कामे नांदेडहून फोनद्वारे चालतात ऑफिसच्या टाईम मध्ये वेळेवर कुठलेच अधिकारी व काही कर्मचारी उपस्थित नसतात ते आपल्या मर्जीने येतात व जातात त्यामुळे या कार्यालया अंतर्गत जी विकास कामे चालू आहेत ते कामे पूर्णपणे बोगस होत आहेत याची सूचना फोनद्वारे व पत्राद्वारे कार्यकारी अभियंता साहेब व उपअभियंता साहेब भोकर व हदगाव यांना तक्रार देऊनही कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही तक्रारीच्या अर्ज हे या कार्यालयामध्ये कित्येक महिने व वर्ष पडून राहतात पण याकडे कोणीही लक्ष देत नाही या विभागा मार्फत जेवढे काही रोड व पुलाचे बांधकाम झालेले आहे ते पूर्णपणे बोगस झाले आहेत यामध्ये काही प्रमाणात खेडेगावांमध्ये किंवा शहरांमध्ये या खात्याअंतर्गत जे सी.सी. रोडचे बांधकाम झाले आहे ते अंदाजपत्रकाप्रमाणे न होता थातूरमातूर कामे करून गुत्तेदार यांच्याशी हात मिळवणी करून कामे उरकून टाकली आहेत तरी याकडे मा. खासदार साहेबांनी, मा. आमदार साहेबांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन भ्रष्ट अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कार्यवाही करावी अशी भोकर तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे