
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारे नागरिकांचे अनेक कामे मार्गी लावणारे लोहा न.पा.चे कर्तव्यदक्ष अभ्यासु लोकप्रिय नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक अमोल व्यवहारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे लोहा शहरांच्या पंरपंरेनुसार लोहा न.पा. चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत म.रा.म. पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष केशव पाटील पवार यांच्या वतीने खारिक खोबऱ्याचा हार घालून पेढे भरवून अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी लोहा न.पा.चे लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी, नगरसेवक प्र.नारायण येलरवाड, नगरसेवक प्र.नबीसाब शेख, लोहा न.पा. चे कार्यालयीन अधीक्षक उल्हास दादा राठोड,म.रा. म.पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष केशव पाटील पवार, सुरेश महाबळे, मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास सावळे,म.रा.म.पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष जगदीश पाटील कदम, हनमंत पाटील मोरे, प्रकाश पाटील पवार, सामाजिक कार्यकर्ते गोविंद वड, रहाटकर न्युज पेपर एजन्सी चे संचालक पांडूरंग सावकार रहाटकर, बालाजी पाटील आईनवाडीकर, लक्की फुलवरे,राम पल्लेवाड, आदी उपस्थित होते.