
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
लोहा : दि.31मे 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय दापशेड ता.लोहा जि.नांदेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी न करता व त्यांच्या जयंतीनिमित्त गावातील दोन महिलांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान न करता यासंदर्भात प्रश्न विचारणाऱ्यांना सरपंच प्रतिनीधीच्या पत्नीने अरेरावीची भाषा केली व तसेच ग्रामसेवकांना फोनवर विचारले असता आमच्याकडे फोटो उपलब्ध नसल्यामुळे आम्ही जयंती साजरी केली नाही असे उडवाउडवीचे उत्तर दिले .
महाराष्ट्र शासनाचा जयंती संदर्भातला शासन निर्णय कागदावर ग्रामपंचायत कार्यालयाने दाखवला असुन मे महिन्यात येणा-या 4 मे छत्रपती संभाजी महाराज जयंती 22 – मे महाराणा प्रतापसिंह 28 मे – स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती सह 31 मे – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशी कोणतीच महापुरुषांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय दापशेड ता.लोहा येथे साजरी करण्यात आली नाही. प्रशासनाच्या दृष्टीने ही खूप मोठी चुक आहे. महापुरुष हे राष्ट्रांची संपती आहे.त्यांचा योग्य सन्मान करणं हे आद्यकर्तव्य आहे.देशभरात सगळीकडे महापुरुषांच्या जयंत्या उत्साहात साजरा होत असताना दापशेड ता.लोहा या गावात या महापुरुषांच्या जयंती ग्रामपंचायत स्तरावर साजरा न करणे ही खुप मोठी शोकांतिका आहे. महापुरुषांच्या अपमान करणाऱ्या व कर्तव्यात कसुर करणाऱ्या संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांची सविस्तर चौकशी करून त्यांच्यावर वर योग्य ती कारवाई करुन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशी मागणी विठ्ठल कापसे,किशन टोनगे, अँड अनिल होळगे,आनंदा वाघमारे,मारोती मोरे सह गावातील तरुणांनी केली आहे.