
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
नांदेड : – केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान मंञालयाच्या युआयडीएआय विभागाने निवीन नियम जारी केले असुन दहा वर्षापूर्वी काढलेले आधारकार्ड अद्यावत ( अपडेट ) करणे प्रत्येकाला अनिवार्य केले असुन या संदर्भात नांदेड येथील जिल्हा अधिकारी कार्यालयात प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले या शिबिरात मुख्य मार्गदर्शन डिस्टीक प्रोजेक्ट मॅनेजर निरज धामणगावे सर यांनी केले.
या शिबिरात आधारकार्ड अपडेट करणे मोबाईल नंबर लिंक करणे पॅनकार्ड लिंक करणे , ईमेल आयडी अपडेट करणे सह अन्य विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी वसीम सर , वाजीद सर सह जिल्ह्यातील सर्व ऑपरेटर उपस्थित होते.