
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- एस एस सी चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. मसलगा ता कंधार या गावची मुलगी अस्मिता सुधाकर वडजे या मुलीने कौठा सेंटरमध्ये तिसरा नंबर पटकावला आहे .ती येल्लुर येथे श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल या संस्थेमध्ये शिक्षण घेत होती. मसलगा या गावा पासुन ३ किलोमीटर अंतरावरील शाळा होती ती सहज पणे दररोज ३ किलोमीटर चालत जायायची आणि यायची पन अशा परिस्थितीत तिने कोणते ही क्लासेस न करता अस्मिता वडजे नी ९३% घेऊन त्यांच्या परिवाराचे व गावचे नाव रोशन करण्याचे काम केले आहे तरी अस्मिता ला सर्व क्षेत्रातुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. भविष्यामध्ये नक्कीच ती तिच्या परिवाराचे नाव लोकिक करणार असल्याचे तिच्या शिक्षकांकडुन माहीती मिळाली. ती शाळेमध्ये शिक्षक शिकवीत असते वेळी ती सरांना पुढचा प्रश्न विचारत होती त्या मुळे सर्व शिक्षक ही सांगत होते अस्मिताचे शिक्षण पुढे चालु ठेवावे ती नक्कीच एक मोठी अधिकारी म्हणून तुमच्या समोर तयार होईल .अस्मिता ला पुढील शैक्षणिक जीवनासाठी खुप खुप शुभेच्छा