
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पेठवडज मध्ये सी.सी.टी.व्ही .कॅमेरे. व ए .टी.एम कार्ड वाटप करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यालय नांदेड येथे मागणी केली आहे. सी.सी.टी.व्ही नसल्यामुळे संबंधित अधिकारी आपली मनमानी करत आहेत व जनतेस गैरसोय होत आहे याबद्दल संबंधित अधिकाऱ्याकडे वेळोवेळी निवेदन देऊनही कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व्यंकट जाधव ,हरिश्चंद्र राजे ,पांडुरंग कंधारे.,गजानन जाधव .यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शाखेत सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवून देण्यात यावे व ए.टी.एम कार्ड वाटप करावे अन्यथा आम्ही नाईलाजास्तव पेठवडज येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेसमोर आमरण उपोषण करू असा ईशारा संबंधित शाखेला व मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे दिला आहे ग्राहकांना पैशासाठी तासंतास उभे रहावे लागत आहे यामुळे ग्राहकांना ए.टी.एम कार्ड वाटप केल्यास आपल्या अडचणीनुसार आपल्या खात्यातील पैसे कुठेही उचलू शकतील पण संबंधित शाखेने एका वर्षापासून ए.टी.एम कार्ड वाटप केले नाहीत तरी यांची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.