
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा.दवणे
मंठा येथे नुकत्याच रुजू झालेल्या तहसीलदार रूपा चित्रक यांची व्हाईस मीडिया पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी जेष्ठ पत्रकार बाबाकाका कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल बा खंदारे, रवि भावसार,मंजुषा काळे,सुरेश दवने, गजानन माळकर,अश्पाक शेख, अतुल खरात यांनी तहसीलदार चित्रक यांचे स्वागत केले.
तहसीलदार चित्रक यांनी संवाद साधतांना हे कार्यालय सदैव जनतेसाठी खुले असून या करिता प्रलंबित कामांसाठी मध्यस्थी किंवा शिफारशीची गरज नसल्याचे स्पष्ट केले.नागरिकांनी माझ्याशीही थेट संपर्क करावा, असे चित्रक म्हणाल्या. महा खनिज शासनाने चालवले रेतीचे धोरण आगामी दोन महिन्यात होईल.वाळू चोरी रोखण्यासाठी बैठे पथक नेमणूक,वाळू साठा जप्त करून कारवाई करू तालुक्यातील नागरिकांना मोठी अडचण असल्यास माझ्या भ्रमणध्वनीवर सुद्धा माहिती दिल्यास मी तत्काळ नियमानुसार समस्येचे निवारण करेन असे संवाद साधताना त्या म्हणाल्या.