
पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्या शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा.दवणे
मंठा निसर्गाच्या लहरीपणामुळे ऋतूचक्र उलटे फिरू लागले आहे. पंधरा दिवसापूर्वी येणार
मान्सूनचा पाऊस अद्यापही थांबला असल्याने शेतकऱ्यांच्या आसुसलेल्या नजरा मेघराजाकडे रोखून आहेत. तालुक्यात मान्सूनचा पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.
जून महिना सरत आला; मात्र २१ जून रोजी अद्यापही तालुक्यात मान्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून पावसाअभावी तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. १०दिवसात मान्सून बरसला नाही तर खरीप हंगाम धोक्यात येवुन शेकऱ्याचे स्वप्न होरपळून जाण्याची शक्यता आहे. शेतकयांनी पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे रखराखत्या उन्हात घामाच्या धारा वाहून रानबांधणी केली आहे; परंतु पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे कामे खोळंबली आहेत. दरम्यान, अपेक्षित व्यवसाय होत नसल्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करुन ठेवल्याने बियाणे-खत विक्रेत्यांनाही ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
जून महिना सरतल्यानंतरही बाजारात कोणकोणते चांगले वाप आले, यासाठी शेतकऱ्यांनी चाचपणी केली होती परंतु पावसाने हजेरी लावली नसल्याने तालुक्यात पेरण्या केल्या नाहीत. अनेक दुबार पेरणीचा अनुभव शेतकऱ्यांना घ्यावा लागल्यामुळे त्यांना नुकसान सोसावे लागले. त्यामुळे या वर्षी दमदार पाऊस झाल्याल्यानंतरच पेरणी करण्याकडे शेतकन्यांचा कल आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी पेरणी पुर्व मशागतीचे काम आवरून पाऊसाकडे लक्ष लागले आहे. मंठा तालुक्यात सिंचनाची वाणवा असल्याने बहुतांश शेतकरी निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. यंदा उन्हाळ्यात जणू पावसाळा अनुभवायास मिळाला. ऋतुचक्र कूस बदलत असल्याने त्याचा मोठा फटका शेती व्यवसायाला बसतो आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी पूर्व पावसाळी कामे आटोपून खरिपाची तयारी केली आहे. रोहिणी नक्षत्र कोरडेच गेले. आता मृग नक्षत्र सुरू होऊन सरत आले तरी पावसाचा थांगपत्ता नाही. अवेळी राढा करणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे नियोजन बिघडते आहे. पावसाळ्याच्या पहिल्याच चरणात पाऊस रुसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. मृगसरी कधी बरसणार याकडे शेतकन्यांच्या नजरा लागून आहेत.
पड रे पान्या, पड रे पान्या, कर पाणी पाणी…
शेत माझं लई तहानलं चातका वाणी….
बघ नांगरलं नांगरलं, कूळवून वज केली,
सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली….
४० वर्षांपूर्वी गायक प्रल्हादशिंदे यांच्या जादुई आवाजाने
ओळीतील मांडलेला शब्द न शब्द
शेतकन्यांच्या मनातील आर्जव
अजरामर लोकगीताच्या या गाण्यांच्या तितक्याच ताकदीने हृदयाचा ठाव घेतात. चौकट [शेतकऱ्याचे आणि पावसाचे नाते किती हावळ्या संबंधाने घट्ट आहे] शेती व्यवसाय ज्यांच्या उपजीविकेचे साधन आणि निसर्गातून कोसळणारी जलधारा हेच ज्यांच्या शेतीचा आधार आहे. अशा शेतकऱ्यांचे पावसाची असलेले नाते किती हळव्या संबंधाने घट्ट विणलेले आहे. याची प्रचिती है। गाणे ऐकताना येते. शेत शिवारातील कामाच्या लगबगीतून शेतकऱ्यांची निसर्गाकडून होत असलेली अपेक्षाच यानिमित्ताने दिसून येत आहे. त्यामुळे काळ्या आईची सेवा करणाऱ्या बळीराजाला पावसाची आस लागून राहिली आहे.