
दैनिक चालु वार्ता
उपसंपादक धाराशिव नवनाथ यादव
धाराशिव:- संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे गठण पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या शिफारशीनुसार करण्यात आलेले आहे.यामध्ये विधानसभा क्षेत्र व तालुकानिहाय समितीचे गठन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ही यादी जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष आणि इतर सदस्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष पदी देवळाली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान सातव यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.सुनील थोरात,ज्योती पाटील ,बालाजी पांढरे, संताजी सुपेकर, कृ.उ.बा.समितीचे संचालक विशाल ढगे, रवींद्र मोहिते ,सुग्रीव मुरूमकर,आप्पासाहेब भराटे महादेव वडेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.सदस्य सचिव म्हणून तहसीलदार काम पाहणार आहेत.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व मुख्य अधिकारी नगरपालिका हे सदस्य म्हणून काम पाहतील.मागासवर्गीय अशासकीय सदस्य,महिला सदस्य, इतर मागावर्गीय/विजाभज सदस्य, सर्वसाधारण सदस्य, दिव्यांग सदस्य,शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचे अशासकीय सदस्य, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ता,ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. योजनेसाठी निकष पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याचे काम ही समिती करणार आहे.