
लातुर जिल्हयातिल जळकोट तालुक्यातल्या ढोरसांगवी या गावात कोरो इंडिया या संस्थेच्या ग्रासरुटस नेतृत्व विकास कार्यक्रमा आतर्गत श्रमीक क्रांती आभियान महाराष्ट्र,या बिगर राजकिय संघटनेच्या वतीने दि.२१/६/२०२३ रोजी शेतकरी शेतमजुरांची बैठक घेण्यात आली या बैठकीत गावातील प्रश्नाचा शोध घेतले आसता घरांसाठी आतिक्रमण करुन राहात आसलेल्या लोकांचे रहाते घरे नावावर नाहीत.मजुर समुहाच्या नावे स्मशानभुमी नाही,कुंटुंब वाढीमुळे व इतर कारणामुळे बेघरांच्या संख्येत वाढ झाली आसुन काही लोकांना रहाण्यास जागे नाहीत,गावातील एकल महिला या शासकीय योजने पासुन वंचित आहेत, इत्यादी प्रश्न समोर आली आसुन या संस्था संघटनेच्या वतीने या समस्या ची नोंद घेण्यात आली आहे,,तुमचे प्रश्न सोडवुणीकीसाठी तुम्ही कुणावरही आवलंबुन न रहाता तुम्ही सज्ज आसावे,आसे वक्तव्य श्रमीक क्रांती आभियानाचे प्रमुख मारुती गुंडीले यांनी यावेळी केले, तुमचे प्रश्न सोडवुणुकीच्या कामात सारथी च्या भुमिकेत संस्था संघटना तुमच्या बरोबर आहे आसे ही ते म्हणाले ते पुढे म्हणाले,भारताचे संविधान व या देशातील कायदे व विकास योजनांची माहीती हे सर्व सामान्यांना माहित आसणे हे न्याय मिळवुन Smartphone विकास घडवुन आण्णयाच्या दृष्ठीने महत्वाचे आसुन ती माहीती संस्था संघटन तुम्हाला पुरविल यामुळे न्याय,विकासाची लढाई आम्हाला सहज लढवता येऊन त्यात यशही मिळवता येईल आसे ही ते म्हणले आमचे कल्याण करण्याची जिम्मेदारी संविधानाने सरकारवर टाकली आसुन सरकारच्या उदासिनते मुळे आमचा वनवास कायम जशाचा तसाचं आहे,याचा सरकारला सनदशीर मार्गाने आम्ही जाब विचारला पाहिजे,आसे ही ते बोलत होते दर दहा वर्षाला बेघरांचा सर्वे होऊन गावठाण विस्तर केला जाऊन बेघरांना जागे देणे सरकारचे काम आहे,मात्र पंचेविस वर्ष होऊन ही या योजनेची आमलबजावणी करण्यात आली नसल्याने बेघर लोकांनी घरासाठी सरकारी जागेवर आतिक्रमण करुन वास्तव्या करीत आहेत,तेही अतिक्रमणे कायम करण्या संबधीचा सरकारकडुन काढलेला जी.आर.आसतांना त्याची ही आमलबजावणी सरकारने केली नाही आता मात्र पुरावे मागणी करुन आपली घरं काढण्याचे नियोजन सरकार चालवणतं आहे, हे आपल्यावर आन्याय आहे मात्र आपण याचे उत्तर कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने दिले पाहिजे आसे ही ते बोलत होते या समोर आलेल्या समस्या व प्रश्न सोडवणुकीसाठी सर्वानी सनदशीर मार्गाने प्रयत्न करण्याचा निर्णय ही घेण्यात आला.या बैठकीत संघटनेचे प्रमुख मारुती गुंडीलेसह लक्ष्मण रणदिवे.एकल महिला संघटना व श्रमीक क्रा़तीच्या जळकोट तालुका प्रमुख आनिता गायकवाड,शारदाताई मुंगे,तानाजी सोनकांबळे,आरुणसांगवीकर, सुरेश डाले,परमेश्वर वाघमारे,सोपान वाघमारे,बाराजी वाघमारे,बळी वाघमारे,प्रकाश वाघमारे,मकदुम शेख,इमाम शेख,सागरबाई सोनकांबळे,रेखा सांगवीकर,कविता भाले,फर्जाना शेख,उषाबाई ढगे,सुनंदा कांबळे.उपस्थीत होते.