
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर येथे विसावला. देहू ते पंढरपूर ह्या वाटेवर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना इंदापूर येथील शिवदत्त जनकल्याण ट्रस्ट व रोट्रॅक्ट क्लब ऑफ इंद्रेश्वरच्या वतीने, जवळपास तीन हजार वारकरी वैष्णवांनी मोफत टेस्टी वडापावचा आस्वाद घेतला. यावेळी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, इंदापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते वाटपाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी शिवदत्त जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चौगुले, अधिकारी रवींद्र चौगुले,सामजिक कार्यकर्ते संजय खंडागळे, अमर नलवडे, रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरचे अध्यक्ष मच्छिंद्र किरकत, आकाश खरात,
अजय सपकळ, गणेश सपकळ, अविनाश खंडागळे, रुपेश जाधव, रवी मोरे, विलास विटकर, आचारी नितीन सामसे, आनंद गवळी, श्याम वडेवाले, मोहिनी शिंदे, सुनिता पवार, संगीता पवार, सविता जाधव, सुनिता चौगुले, पंकज शिंदे इत्यादी उपस्थित होते.
तसेच पायी चालत येणाऱ्या दोन हजार वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर पाच हजार वारकऱ्यांना, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी ठणकणे, वात, कणकणी, पित्त, जुलाब, उलटी तसेच खोकल्याचे पातळ औषध व अंग दुखीचे मलम यावरी गोळ्या व औषधें मोफत वाटप करण्यात आले. तर वैद्यकीय तज्ञ राहुल निंबाळकर, आरोग्य सेविका मंजुळा साबळे, सायन दामोदर, सुप्रिया राऊत, सुकेश निरंदिवे, प्रगती काळे यांनी मोफत आरोग्य तपासणी व मेडिकल गोळ्या औषधे वारकऱ्यांना देण्याची सेवा केली.
युवकांची सामजिक बांधिलकी उल्लेखनीय
इंदापूर शहरातील तरुण युवक सामजिक सेवेच्या भावनेतुन, एकत्र येत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी अन्नदान सेवा करतात. वारकरी वैष्णवांचा आरोग्याची काळजी करून, त्यांना मोफत औषधे व गोळ्या वाटप करतात. शिवदत्त ट्रस्ट व रोट्रॅक्ट क्लबचे वर्षभर सामजिक उपक्रम चालू असतात. याचा आनंद वाटतो. तुम्हा युवकांची सामजिक बाधिलकी खऱ्या अर्थाने उल्लेखनीय आहे. अशा शब्दात युवकांना उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी शाबासकी दिली.