
दै.चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा– माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परंडा यांच्या वतीने मा तहसिदार मार्फत जिल्हाधिकारी साहेब उस्मानाबाद निवेदन देण्यात आले
या निवेदनावर सविस्तर अशी माहिती आहे कि बार्शी तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते आकाश दळवी व त्यांचे सहकारी यांना मौजे खांडवी ता बार्शी येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती प्राप्त होताच त्याची माहीती पोलिस प्रशासनास देऊन घटनेच्या स्थळी गेले असता त्यांना व त्यांच्या सहकार्यांना बेदम मारहाण करण्यात आली त्यांच दोन्ही हात व दोन्ही पाय फॅक्चर झाले असुन त्याना सध्या बार्शी येथील डॉ जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये ट्रामा सेंटर मध्ये दाखल करण्यात आले असुन ते सध्या बेशुद्ध अवस्थेत आहेत . त्यांच्या कुंटूंबाला अर्थिक मदत करण्यात यावी व त्यांच्या कुटूंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच
वाळू माफियांवर दिवसेंदिवस वाढ होत असून हल्ले करण्याचे प्रमाणही वाढत आहे.
तरी वेळीच प्रशासनाने कारवाई करून अशा अवैध वाळू उत्खनन व वाहतूक माफियांवर अंकुश ठेवावा व प्रशासनाच्या सहकार्याला संरक्षण द्यावे.
बार्शी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आकाश दळवी व त्यांच्या सहकार्यावर वाळू माफियांकडून झालेल्या हल्ल्याची चौकशी करून
प्रशासकीय कारवाई करावी व आरटीआय कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केलेल्या तक्रारींची दखल घेऊन माहिती अधिकार कार्यकर्त्यांची त्वरित चौकशी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा
असे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परंडा तालुक्यातील कार्यकर्ते यांच्या वतीने परंडा तहसिल मार्फत माननिय जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांना देण्यात आले तसेच पुढील कार्यवाहीसाठी परंडा पोलिस निरिक्षक पोलिस ठाणे परंडा यांना देण्यात आले
या निवेदनावर सर्व माहिती अधिकार कार्यकर्ता फारूख शेख धनंजय गोफणे विजय मेहर फारूख मुलाणी अमित आगरकर कानिफनाथ सरपणे जमिर सिखलकर जावेद शेख आस्लम पल्ला राहुल बनसोडे लक्ष्मीकांत बनसोडे आबा कोकाटे किशोर येवारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत