
अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): नजीकच्या ग्रा. पं.धाडी येथील सरपंच दिलीप भाकरे यांच्या अपात्रतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथील न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी स्थगीती दिली आहे त्यामुळे सरपंच दिलीप भाकरे यांना दिलासा मिळाला आहे याबाबत असे की,सरपंच यांनी अतिक्रमण केल्याच्या कारणाहून स्थानिक रहिवासी प्रतिनिधीनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती तेथे सरपंच दिलीप भाकरे यांना अपात्र घोषित करण्यात आले होते त्याविरोधात सरपंच यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेत आपली बाजू मांडली न्यायालयाने युक्तिवाद विचारत घेत न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्या न्यायालयांने सरपंच दिलीप भाकरे यांच्या अपात्रतेला स्थगिती दिली आहे
*प्रतिक्रिया* मी लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवून सरपंच झालो आहे त्यामुळे मी अपात्र होणे हा मला निवडून दिलेल्या मतदारांचा अपमान आहे त्यासाठी माझा लोकांसाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढण्याचा प्रयत्न राहील
सरपंच
दिलीप भाकरे ग्रा.पं.धाडी