उपोषण मंडपास लोकप्रतिनिधी व प्रशासनाची पाठ
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : तालुक्यातील भंडारज येथील ग्रा.पं.सदस्य निलेश राक्षसकर यांनी विविध मागण्यांसाठी २२ जून पासून ग्रामपंचायत,आठवडी बाजार येथे आमरण उपोषण सुरु केले आहे.मात्र;लोकप्रतिनिधी व प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्याचे ग्रा.पं.सदस्य निलेश राक्षस्कर यांनी म्हटले.
भंडारज येथील ग्रा.पं.सदस्य ठेकेदाराला इस्टीमेटप्रमाणे दिलेल्या १०८ जणांचे नळ कनेक्शन व बिल मिळणेबाबत,गरजवंतांना घरकुल मिळणेबाबत,संपुर्ण गावात सुरळीत पाणीपुरवठा करणे,हाय मास्ट लाईट लावणे,वार्ड क्रमांक ४ मध्ये मोफत नळ कनेक्शन द्यावे,शासकीय व निमशासकीय कार्यालय
वेळेवर सुरु राहणेबाबत,ग्रामपंचायत मध्ये शिपाई पद भरती करणे व पदाची मुनादी देणेबाबत आदी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला लोकप्रिनिधी व शासकीय अधिकारी यांनी अद्यापही भेट दिली नाही.
आमरण उपोषणाला यावेळी विठ्ठल सावळे,विनोद राक्षसकर यांनी उपोषण मंडपाला भेट दिली व रामभाऊ डोंगरे,ग्रा.सदस्य विद्या राक्षसकार,अरुण हुरबडे,शाशू दिपटे,नितीन निमकळे,राहुल राक्षसकार,रामेश्वर बुंदिले,आशिष राक्षसकार,विकास राक्षसकार,प्रकाश ढोके,शुभम निमकळे,गजानन खंडारे,पंकज पानझाडे,राहुल डांबळे,ग्रामस्थ व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
मी निलेश राक्षसकर भंडाराज येथे उपोषणाला २२ पासून विविध जन-समस्या बद्दल उपोषणाला बसलो आहे.परंतु ग्रामपंचायत ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो व खुर्ची सुध्दा दिल्या नाहीत.यावरून ग्रा.पंचायत किती संवेदनशील आहे हे दिसून येते.
निलेश राक्षसकर,ग्रा.पं.सदस्य भंडाराज…


