दैनिक चालू वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी
बीड अंबाजोगाई
अंबाजोगाई :- येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचे न्यायालयात केस नंबर १८१/२०११ सरकार वि.संजय या प्रकरणी सुनावणी होऊन आरोपी तानाजी रामकिसन जोगदंड रा.शिराळा ता.लातूर मा.न्या.झेड.झेड.खान साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली.
सदरील प्रकरणाची हकीकत अशी की, मौ.पोखरी शिवारातील वाघाळा ते लातूर जाणारे रोडवर दिनांक २४/०७/२०१० रोजी ८.३० वा. चे सुमारास आरोपीने त्याचे ताब्यातील -ट्रक क्रमांक एम एच-०४ए ए १७४ ही निष्काळजीपणे व हायगयीने भरधाव चालवून इंडिका कार क्र एमच २४सी ६९५१हिस धडक देऊन गंगाबाई मेघराज उपाध्याय हिचे मृत्यू झाला ,मनोजकुमार उपाध्याय,देवांश उपाध्याय व कार चालक सचीन काळे यांना गंभीर जखमी केले ,म्हणून आरोपी तानाजी रामकिसन जोगदंड रा.शिराळा ता.लातूर याचेविरुद्ध कलम ३०४ (ए), ३३७, ३३८ भा. द वि प्रमाणे गुन्हा नोंद करून अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनीआरोपीच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले नंतर प्रकरणाची सुनावणी माननीय न्यायालयात झाली असता फिर्यादी बाजू कडून एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आली परंतु सरकार पक्ष आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध न करू शकल्यामुळे व आरोपीच्या वकिलाचा बचाव गृहीत धरून आरोपी तानाजी रामकिसन जोगदंड रा.शिराळा ता.लातूर मा.न्या.झेड.झेड.खान साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली.
सदरील प्रकरणात आरोपीतर्फे अँड.अनंत सोनवणे यांनी काम पाहिले. त्यांना सहकार्य ॲड राहुल मुंडे व ॲड दिलीप चामणर यांनी सहकार्य केले .


