
दै. चालु वार्ता
उपसंपादक पुणे जिल्हा, शाम पुणेकर..
पुणे : उशिरा का होईना, पण पुण्यात धो धो पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच पुण्यात धुंवाधार पाऊस झाला. काही दिवस वातावरणात उकाडा जाणवत होता, लोक हैराण झाली होती. आज पाऊस पडल्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या पावसामुळं शहरातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होवू पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
पुढील ४८ तासांत पुण्यात धो धो पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा इशारा. पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसरात देखील पुढील चार तासात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. थोडक्यात मान्सून सुरू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ह्या अचानक आलेल्या पावसाने पुणेकर आनंदले आहेत. सर्वत्र थंड व आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांनी नेहमी प्रमाणेच आजच्या पावसातही मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला आहे.