
भूमिपूजन सोहळ्यात जेष्ठ समाजिक कार्यकर्ते दिगंबर पोले मामा यांचे गौरवद्द्गार
दै.चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी
विष्णु मोहन पोले
लातुर/अहमदपुर: उर्धव मनार उपसासिंचन योजना अंतर्गत सुमठाणा येथील डावा कालवा व उजवा कालव्याचे सिमेंट काँक्रिट चे अस्तीकरण करण्याचे भूमिपूजन अहमदपुर -चाकूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर करताना सुमठाणा येथील जेष्ठ समाजिक कार्यकर्ते तथा सोसायटी चेअरमन दिगंबर पोले मामा यांनी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधवानीच आम्हाला मार्गदर्शन करत लिंबोटी धरणाच्या प्रस्तावावेळी आमच्या भागातून कॅनोल यावा आणी धरणाचं पाणी कॅणाला नी आमच्या तलावात याव अस निवेदन द्याला सांगितलं त्या दूरदृष्टी मुळेच आम्हाला आज शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल आहे आणी येथिल शेतकऱ्यांच जीवनमान उंचावण्यास मदत झाली.त्याच धर्तीवर विद्यमान आमदारांनी पण आमच्या मन्याड खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी खूप कार्य केल त्यामुळेच माळावर वसलेलं हे गाव आज पश्चिम महाराष्ट्राला लाजवेल अशा पद्धतीन हरित पणान नटलेलं आहे याच सर्व श्रेय बाळासाहेब जाधव आणी बाबासाहेब पाटील यांच आहे आम्ही गावकरी त्यांचे कायम ऋणी राहू अशा पद्धतीच मत पोले मामानी आपल्या प्रस्ताविक भाषणातून मांडल या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.बापूदेव महाराज बेलगावकर होते आणी सांबजी महाजन,अजित बालू रेड्डी,शिवानंद हेंगणे,मंचकराव पाटील,माधव जाधव,शिवाजीराव देशमुख,संजय पवार,मंगेश नागरगोजे,विलास नागरगोजे,मदनभाऊ मुसळे,चंद्रहास उर्फ पप्पु हमने, गणेश पोले,बळीराम पोले, विश्वनाथ पोले, गंगाराम पोले,तुकाराम नामपल्ले, दत्ता मुसळे,भगवान पोले,नंदराज पोले पाटील,आणी इतर पंचक्रोशीतील नागरिक ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.