
मंठा तालुक्यात पावसाची दडी शेतकरी हवालदिल..
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे
मंठा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मेघ गर्जना विजच्या कडकडाटासह पावसाच्या नक्षत्राला सुरुवात होते, त्यात २४ मे पासून पावसाच्या रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली त्या पाठोपाठ मृग या दोन्ही नक्षत्रामध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराला ४३डिग्री तापमाणात पेरणीपूर्व मशागत केली. मृग कोरडा गेल्याने हवामान खात्याच्या अंदाज चुकीचा ठरल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. आता आर्द्रा नक्षत्राकडे बळीराजा मोठया आशेने बघत होता की, आद्रात नक्षत्राची सुरुवात होताच पावसाची दमदार सुरुवात होईल. हवामान खात्याने २५ जूनपासून पावसाचे आगमन होईल असे भाकीत केले होते.
मात्र मंठा तालुक्यातील बहुतांशी पीक पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे रोहिणी नक्षत्रापाठोपाठ मृगाणे हुलकावणी दिली असल्यामुळे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयत्न करण्यात आले. त्याचाच परिणाम की काय आर्द्रा नक्षत्रास सुरुवात झाली आणि रवीवारी (दि. २५) सकाळपासून दमट वातावरण तयार झाल्याने पावसाचे आगमन होईल असे वाटत असताना मात्र सोमवारी सकाळ पाऊस पडण्यास संथगतीने अडकत निराशा जनक सुरुवात झाली असली त्यामुळे शेतकऱ्याचा उत्साह वाढला परंतू पेरणीच्या कामाला आत्मविश्वास कमी दिसत आहे. काही शेतकरी रिस्क घेत कापूस लागवड करीत आहे.
परिसरातील आजूबाजूला पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, उन्हाची दाहकता कमी झाल्यामुळे नागरिक सुखावला आहे. सोमवारी सकाळी पावसाने हजेरी लावली पण संध्याकाळ पर्यंत अंग भिजलं नाही त्यानंतर मंगळवारी सकाळी ६ वाजतापासून पावसाला सुरुवात झाली पण सोमवारची पुनरावृत्तीच दिवसभर फिरून डोक्याचे केस कोरडेच अशा चालु
झालेल्या पावसामुळे शहरातील व ग्रामीण भागातील रस्ते भिजलेले दिसत आहेत पण शेतातील मातीच्या ढेकळ कोरडा असुन खाली जमीन खरखरं दिसत आहे. जून महिना संपत आला तरी पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे
शेतकरी मागील सर्व विसरून या वर्षी चांगले पीकपाणी येईल या आशेने पेरणीपूर्व मशागतीच्या कामास लागला. नंतर रोहिणीसह मृग नक्षत्रही कोरडेच गेले. त्यामुळे आता आद्रा नक्षत्रात शेतकरी पेरणीकरिता पावसाची चातकासारखी वाट पाहत होते.
वरुणराजा बरसावा यासाठी अनेक गावांत नानाविध उपाययोजना करण्यात आल्या. अखेरीस आर्द्रा नक्षत्राची सुरुवात होताच दमदार पावसाने हजेरी लावेल अशी अपेक्षा होती.मात्र पावसाची संथगतीने गतीने अडकत सुरुवात झाल्याने पावसाची अशीची परिस्थिती राहिली तर पेरणी योग्य पाऊस केव्हा पडेल आणि पेरणी कधी होईल अशा अडचणीत शेतकरी सापडला आहे.