दै.चालू वार्ता
प्रतिनिधी,उमापूर
कृष्णा जाधव
गेवराई/उमापूर 28जुन पासुन पडत असलेल्या पावसाने उमापूरकर सुखावले, आता पेरणीला भरपूर वेग आला असून, उमापूर व उमापूर परिसरातील सर्व शेतकरी बंधू आता सध्या कापूस लागवडीच्या हालचालीत आहेत.जून महिन्याच्या शेवटी का असेना पण शेतकऱ्यांनी धीर सोडला नाही, खरं ग्रामीण भागात शेती शिवाय पर्यायही नाही,
सध्याच्या परिस्थितीत एवढे पाऊस नसून, एक महिना उलटून जाऊन ही पुन्हा पावसाची आशा शेतकऱ्यांना लागली असून सर्व शेतकरी पेरणी व कापूस लागवडीच्या मागे लागले आहे,
उमापूर या परिसरात जास्तीत जास्त शेतकरी वर्ग असून, सध्याच्या परिस्थितीत शेतकरी राजा हा आर्थिक संकटात सापडला असून शासनाने शेतकऱ्यांना मदत देणे हे गरजेचे आहे.कारण वाढत्या बी बियाणेच्या किमतीं मुळे,व वाढत्या खतांच्या किमतीमुळे, सध्या तर शेतकऱ्यांना काहीच सुचत नसल्याने
बळीराजा हैरान झाला असून बळीराजाला पुन्हा उभा करण्याची गरज आहे.
मागील वर्षाचा अंदाज घेता कापूस बे भाव विकला गेला बळीराजाला कापसा मध्ये पूर्ण तोटा सहन करावा लागला, अशा परिस्थितीत त्याला उभा राहण्याचे बळ सरकारने दिले पाहिजे बळीराजांनी पिकवलेले धान्य, कापूस बे भावाने घेतला जातो,
व बी बियाणे ला त्यांच्या मनमर्जीने भाव लावला जातो,हि एक बळीराजावर अन्यायकारक गोष्ट आहे,दिवसभर उन्हात,पावसात राब राब राबवून पिकवलेले धान्य
कधी अतिवृष्टीने जाते,तर कधी पाऊस न पडल्याने जाते,अशाप्रकारे बळीराजालाआर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते.सध्या परिस्थितीसध्या परिस्थितीत पावसाचे वातावरण चांगले असूनआता सर्वांचे लक्ष पेरणीकडे लागले आहे
