
दै.चालु वार्ता
उपसंपादक पुणे जिल्हा, शाम पुणेकर.
पुणे : पुण्यातील सतत होणा-या अपघातांची मालिका थांबता थांबेना. पुण्यातील प्रसिद्ध चांदणी चौकात आज भरधाव वेगाने येणारी मिनी बस पलटली व अपघात झाला. वेद भवन आणि डुक्कर खिंड या मार्गावर बसचा स्टिअरिंग राॅड अचानक तुटल्याने सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या बस मध्ये एकूण नऊ प्रवासी होते. सुदैवाने सर्व जण बचावले. यातील फक्त एकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. अपघातामुळे येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
या अपघातानंतर काही वाहनधारक माणुसकीच्या नात्याने त्या प्रवाशांच्या मदतीला धावून आले. पलटी झालेली बस रस्त्यावरून बाजूला हटविण्याचे काम चालू होते. सध्या ह्या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.