
दै.चालू वार्ता,वैजापूर,प्रतिनिधी
भारत पा.सोनवणे
वैजापूर– शहरातील एकटा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी पहाटेपासूनच रांग लागली होती. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मुर्तीला आकर्षकरित्या सजवण्यात आले होते. त्यामुळे विठ्ठलाचे हे लोभसवाणे रुप बघण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात रांग लावली होती.
सकाळी सात वाजल्याच्या सुमारास आमदार रमेश बोरनारे यांनी सपत्नीक मंदिराला भेट देत विठुरायाचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिर विस्तारीकरण व सुशोभीकरणासाठी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. यावेळी या कामासाठी आणखी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक स्वप्निल जेजुरकर यांनी आमदार रमेश बोरनारे व संगिता बोरनारे या दांपत्याचा सत्कार केला. यावेळी धोंडिरामसिंह राजपूत, विष्णू जेजुरकर, रवींद्र जेजुरकर, कैलास साखरे, कुमोद जेजुरकर, गोकुळ जगताप, अशोक बोर्डे, कचरू राजपूत, आनंद शर्मा, राजू साकला, प्रसाद जोशी, शांतीलाल संचेती, अजय उपस्थित होते. यावेळी मुंजोबा मित्र मंडळातर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले
सालाबाद प्रमाणे याही वर्षी लोणी बु.गावातून एकटा विठोबा पायी दिंडी सोहळ्याचे नियोजन लोणी बुद्रुक येथिल भाविकांनी या दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला व दिंडी सोहळ्यासाठी सकाळी फराळ सेवा श्री दौलत पाटील जाधव व श्री संजय पाटील इंगळे यांनी दिली…