दैनिक चालु वाेर्ता
उपसंपादक मोहन आखाडे छत्रपती संभाजीनगर
मोदी सरकारने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. घरगुती उपकरणे, मोबाईल फोन, एलईडी, फ्रीज, यूपीएस, वॉशिंग मशीन अशा कित्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे. अर्थ मंत्रालयाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
काय किती स्वस्त?
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता २७ इंच किंवा त्याहून लहान स्क्रीन साईजच्या टीव्हीवर लागणारा जीएसटी १८ टक्के करण्यात आला आहे. हा पूर्वी ३१.३ टक्के होता. २७ इंचाहून मोठ्या टीव्हीच्या जीएसटीसाठी मात्र पूर्वीचाच दर आकारण्यात येईल.
मोबाईल
मोबाईल फोनसाठी देखील यापूर्वी ३१.३ टक्के जीएसटी द्यावा लागत होता. मात्र, आता हा कमी करून केवळ १२ टक्के करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या कंपन्या आपल्या मोबाईलच्या किंमतीत घट करू शकतात. म्हणून, येत्या काळात मोबाईल घेणाऱ्या ग्राहकांना फायदा होणार आहे.
घरगुती उपकरणे
फ्रीज, वॉशिंग मशीन, पंखे, कूलर, गीजर अशा कित्येक घरगुती उपकरणांवरील जीएसटी देखील कमी करण्यात आला आहे. पूर्वी या उपकरणांवर ३१.३ टक्के जीएसटी लागू होता. आता तो कमी करून १८ टक्के करण्यात आला आहे. यामध्ये मिक्सर, ज्यूसर, व्हॅक्यूम क्लीनर, व्हॅक्यूम फ्लास्क आणि व्हॅक्यूम व्हेसल्स अशा उपकरणांचाही समावेश आहे.
यासोबतच, शिलाई मशीनवरील जीएसटी कमी करून १२ टक्के करण्यात आला आहे. तर, केरोसीनवर चालणाऱ्या कंदिलावर असणारा जीएसटी ५ टक्के करण्यात आला आहे. एलपीजी स्टोव्हसाठी असणारा जीएसटी देखील १२ टक्के करण्यात आला आहे.
*एलईडी झाले स्वस्त*
दरम्यान, सरकारने दिलेल्या माहितीनुसार एलईडी बल्बच्या जीएसटी टक्केवारीमध्येही कपात करण्यात आली आहे. पूर्वी एलईडी बल्बसाठी १५ टक्के जीएसटी लागू होत होते. आता ते कमी करून १२ टक्के करण्यात आलं आहे.